Alandi : माऊलींच्या अश्वांचे अंकलीहून आळंदीकडे प्रस्थान

एमपीसी न्यूज- माऊलींच्या अश्वांचे आज (दि.31 मे) अंकलीहून अलंकापुरी आळंदीकडे (Alandi) प्रस्थान झाले.आज सकाळी अंकली येथील राजवाड्यात अश्व पूजन झाले.तसेच श्रीमंत सरदार शितोळे अंकलीकर यांच्या राजवाड्यात  श्री देवी आंबाबाईचे आशीर्वाद घेऊन, श्रीमंत शितोळे सरदार यांनी ध्वज पूजन करून,  माऊलींच्या अश्वांनी प्रस्थान केले.

Pune : पुण्यातील लोणी काळभोर परिसरातून 36 लाख रुपयांचे एम डी ड्रग्स जप्त

यावेळी महादजीराजे शितोळे (श्रीमंत सरदार अंकलीकर),उर्जितसिंहराजे शितोळे(श्रीमंत सरकार अंकलीकर),आरफळकर व ग्रामस्थ उपस्थित होते.याबाबाबत माहिती अश्व चालक/व्यवस्थापक तुकाराम कोळी यांनी दिली. टाळ मृदुंगाच्या वाद्यात ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषत माऊलींच्या अश्वांचे (हिरा ,मोती) आळंदी कडे प्रस्थान झाले (Alandi) आहे.

आळंदीकडे प्रस्थाना वेळी या ठिकाणी होणार मुक्काम:-

दि.31 मे मिरज, दि.1 जून सांगलवाडी राम मंदिर, दि.2 जून इस्लामपूर पेठनाका, दि.3 जून वहागाव, दि.4 जून रोजी भरतगांव, दि.5जून रोजी भुईज, दि.6 जून रोजी सारोळा, दि.7 जून रोजी शिंदेवाडी, दि.8 व 9 जून रोजी पुणे असे या ठिकाणी रात्रीचे  अश्वांचे मुक्काम असणार आहेत.  दि.10 जून रोजी अश्वांचे आळंदी मध्ये आगमन होणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.