Alandi : नवरात्रनिमित्त पद्मावती मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज – नवरात्रनिमित्त सकाळपासूनच आळंदी येथील (Alandi) पद्मावती मातेच्या दर्शनास विशेषतः मोठ्या संख्येने महिला भाविक वर्ग पायी चालत येताना दिसतो. पद्मावती मातेचे मंदिर व सभामंडप परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली आहे.

Saptashrungi : सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवास जल्लोषात प्रारंभ

भाविकांसाठी येथे लाकडी मंडप उभारून दर्शन बारीची (Alandi) सोय करण्यात आली आहे. दिवसभरात हजारो भाविक येथे पद्मावती मातेच्या दर्शनासाठी करता येत असतात. आलेले भाविक पद्मावती मातेस हळदी कुंकू लावून देवीस पुष्पहार अर्पण करतात. नवरात्र निमित्त येथे रात्री धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात. तसेच आळंदीतील शीतळा देवी, लक्ष्मी आई, तुळजाभवानी, बोल्हाई व संतोषी मातेचे दर्शन ही या नवरात्रीच्या निमित्ताने भाविक मोठ्या संख्येने घेत असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.