Alandi : दिघी-आळंदी वाहतूक विभागाची कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट चालकांवर कारवाई

एमपीसी न्यूज : आळंदी शहरामध्ये आज दिघी-आळंदी वाहतूक विभागांतर्गत (Alandi) सायलेन्सर वाजवणाऱ्या दहा दुचाकीवर कारवाई करण्यात आली. त्या गाड्यांचे सायलेन्सर यावेळी जप्त करण्यात आले आहे. या केलेल्या कारवाईमध्ये बहुतांशी बुलेट गाड्यांचा समावेश होता.
याबाबतची माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस आधिकारी शहाजी पवार यांनी दिली. या केलेल्या कारवाईबद्दल आळंदीमध्ये सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून वाहतूक विभागाचे कौतुक होत आहे.
बुलेट बाईकला मॉडीफाय केलेले सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज करत फिरणारे दुचाकीस्वार आपण अनेकदा पाहतो. हॉस्पिटल्स, शाळा, महाविद्यालये तसेच इतर शांत व सार्वजनिक ठिकाणी या सायलेन्सरमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते.
MHADA : ‘म्हाडा’ने घरांच्या उपलब्धतेसाठी प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री
शिवाय अनेकांना विनाकारण त्रासही होतो. बुलेटवरून हवा करत फिरणाऱ्या अशाच अतिउत्साही (Alandi) दुचाकीस्वारांवर आज दिघी आळंदी वाहतूक विभागाने कारवाई केली.