Alandi : दिनेश गुंड यांची जागतिक मानांकन कुस्ती स्पर्धेसाठी निवड

एमपीसी न्यूज- जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने  बिश्केक किर्गिस्तान या ठिकाणी दिनांक 31 मे ते 4 जून  दरम्यान होणाऱ्या जागतिक मानांकन कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती (Alandi) महासंघाच्या वतीने तांत्रिक अधिकारी म्हणून दिनेश गुंड यांची निवड करण्यात आली आहे .

High Court News : न्यायमूर्ती रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

प्राध्यापक दिनेश गुंड हे जागतिक कुस्ती संघटनेचे प्रथम श्रेणीचे पंच असून आज पर्यंत त्यांनी अनेक जागतिक, आशियाई, ऑलिंपिक पात्रता, विश्वचषक कुस्ती स्पर्धेमध्ये तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची तांत्रिक अधिकारी म्हणून काम करण्याची ही 52 वी आंतरराष्ट्रीय स्पर्धा असून अशी कामगिरी करणारे महाराष्ट्रातील ते एकमेव पंच आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांकडून त्यांचे अभिनंदन होत (Alandi) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.