Alandi News: आळंदी मध्ये श्रीज्ञानेश्वरदर्शन ग्रंथ प्रकाशन व लोकार्पण सोहळा पार

एमपीसी न्यूज: आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानाच्या भक्त निवासामध्ये अहमदनगर वाड्मयोपासक मंडळ निर्मित व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुणे पुनः प्रकाशित श्रीज्ञानेश्वरदर्शन (भाग 1 व भाग 2) या सन 1934 मध्ये प्रकाशित ग्रंथाच्या संशोधित द्वितीय आवृत्तीचा ग्रंथ प्रकाशन व लोकार्पण सोहळा जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

यावेळी जि. न्या. संजय देशमुख यांनी त्यांच्या बालपणी आध्यत्मिका विषयाची गोडी कशी लागली याच्या आठवणी सांगितल्या. व्यवहारी सज्जन होण्यासाठी ग्रंथ संपदा फार आवश्यक आहे. मतपरिवर्तनाचे शस्त्र म्हणून आपण हे वापरणार आहोत. तसेच आळंदी देवस्थान च्या घटनेत काही दुरुस्ती करणार आहोत. सर्वांना विश्वासात घेऊन ही घटना दुरुस्ती करणार आहोत. देवस्थान कसे चालवायचे,देवस्थान मध्ये भाविकांचा कसा जास्त फायदा होईल,येथे कोणालाही त्रास होता कामा नये, बदनामी होऊ नये याकरिता ही घटना दुरुस्ती करणार असल्याचे न्या. देशमुख यांनी सांगितले.

Veena Gavankar: चरित्र लेखन – एक प्रवास” या विषयावर ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांची मुलाखत

ज्ञानेश्वरी मधील सहाव्या अध्यायातील दोन योगाची माहिती सांगून त्या विषयी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले. सन्मानीय पाहुणे प्रा. डॉ. सदानंद मोरे (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुणे),श्री ज्ञानेश्वर संस्थान विश्वस्त अभयजी टिळक व ॲड.विकास ढगे पाटील यांनी ग्रंथ प्रकाशना विषयी माहिती दिली.(Alandi News) नेवासा येथे, या ग्रंथाचे प्रथम प्रकाशन झाले. त्याच्या पुनः प्रकाशन व लोकार्पण सोहळा कार्यक्रम आज आळंदीत पार पडला. या कार्यक्रमा नंतर आळंदी प्रस्थान सोहळा विषयाबाबत पालखी दिंडी सोहळा प्रमुखांसमवेत येथे बैठक संपन्न झाली.

alandi news

यावेळी धर्मादाय सहआयुक्त सुनीलकुमार बुक्के साहेब,पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,अप्पर पो.आयुक्त संजय शिंदे, पालखी दिंडी सोहळ्यातील प्रमुख मान्यवर व वारकरी संप्रदायातील मान्यवर येथे उपस्थित होते.(Alandi News) अभयजी टिळक ,विकास ढगे पाटील,योगेश देसाई हे श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त म्हणून चांगला कारभार पाहत आहेत.त्यांची देवस्थान विश्वस्त पदाची कालमर्यादा संपल्या नंतर, देवस्थानचे विश्वस्त पदी  पुन्हा नियुक्ती करावी, असे यावेळेस उपस्थित असलेले काही पालखी दिंडी सोहळ्यातील मान्यवरांनी, जि. न्या. संजयजी देशमुख यांना विनंती केली.उपस्थितीतांनी त्या विनंतीला त्यांच्या पुढे सकारात्मक होकार दर्शवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.