रविवार, जानेवारी 29, 2023

Alandi News : आळंदी मध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

एमपीसी न्यूज : आळंदी येथे दि. 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक आळंदी देवाची (Alandi News) येथे भारतीय बौद्धमहासभा आळंदी शहर शाखेच्या वतीने सामूहिक त्रिसरण, पंचशील, बुद्ध वंदना घेण्यात आली. या वेळी डॉ नीलेश रंधवे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित अस्पृश्यता निवारण व सामाजिक विषमता दूर करण्याच्या कार्याची माहिती दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूर मंत्री असताना कामगारांसाठी कामाचे 12 तास वरून 8 तास केलेले कार्य, महिलांसाठी पगारी प्रस्तुती रजा मंजूर केलेले कार्य, अनेक भारतीय जाती, भाषा,पंथ यांना जोडून ठेवणारा कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या भारतीय राज्यघटना लिहिण्याचे मोलाचे कार्य याबद्द्ल माहिती दिली.  विलास रणपिसे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले धम्मचक्र प्रवर्तन याबद्द्ल माहिती दिली.

Pimpri Crime : किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण

रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष संदीप रंधवे यांनी देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी जातीविषमते विरुद्ध उभारलेल्या चळवळी, आंदोलन , त्यांचे जीवन चरित्र व त्यांनी समाज उपयोगी केलेले विविध कार्य याविषयी माहिती दिली. (Alandi News) यावेळी विश्वनाथ थोरात, बौद्धचार्य  राजेंद्र रंधवे,  अक्षय रंधवे, प्रभानंद शेलार,  विलास खळसोंडे उपस्थित होते.भारतीय बौद्ध महासभा आळंदी अध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे यांनी अभिवादन करून कार्यक्रमाचा समारोप केला.याबाबत ची माहिती चारुदत्त रंधवे यांनी दिली.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनी आळंदी नगरपरिषदे मध्ये  पालिका आधिकारी व कर्मचारी यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर (Alandi News) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.व ग्रामीण रुग्णालय क्रांती पार्क येथे त्यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

Latest news
Related news