Alandi : लाखो रुपयांची खंडणी मागत तरुणाचे अपहरण अन् मारहाण

एमपीसी न्यूज – प्लॉटिंगचा व्यवसाय करणा-या तरुणाला दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यासाठी त्याने नकार दिला असता त्याचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. 13) पहाटे चिंबळी, ता. खेड येथे घडली.

प्रशांत हनुमंत बनकर (वय 25, रा. चिंबळी, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शुभम जैद, गौरव भूमकर आणि त्यांच्या एका अनोळखी साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत शेती आणि प्लॉटिंगचा व्यवसाय करतो. गुरुवारी दुपारी आरोपींनी प्रशांत यांना चिंबळी येथे गाठले. त्यांना जबरदस्तीने त्यांच्या स्विफ्ट कार (एमएच 14 / जी एन 0841) मध्ये बसवून नेले. आरोपींनी जबरदस्तीने प्रशांत यांना त्यांच्या घरी नेले.

दरम्यान, आरोपींनी ‘तुझा प्लॉटिंगचा व्यवसाय जोरात चालेल आहे. आम्हाला आत्ताच्या आत्ता दोन लाख रुपये पाहिजेत’ असे म्हणत पैशांची मागणी केली. यासाठी प्रशांत यांनी नकार दिला असता आरोपींनी प्रशांत यांना त्यांच्या आई, वडील आणि भावासमोर दांडक्याने व लोखंडी पट्टीने मारहाण केली.

  • प्रशांत यांचे आई, वडील आणि भाऊ भांडण सोडवण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.