Alandi : हप्ता मागत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – स्नॅक्स सेंटर चालवणाऱ्या महिलेकडे मासिक हप्त्याची मागणी केली. यासाठी महिलेने नकार दिला असता तिघांनी मिळून तिला मारहाण करत तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवार (दि. 18) ते सोमवार (दि. 27) या कालावधीत चाकण रोडवरील कारवा धर्मशाळेजवळ तुळजाई स्नॅक्स सेंटर येथे घडली. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

संदीप उत्तम मुंगसे (वय 40) आणि भरत ज्ञानोबा मुंगसे (वय 50) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अभिजीत भरत मुंगसे हा आरोपी अद्याप फरार आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला चाकण रोडवरील कारवा धर्मशाळेजवळ तुळजाई स्नॅक्स सेंटर आणि पानटपरी चालवतात. 18 ते 27 मे या कालावधीत आरोपींनी महिलेकडे दर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली. हप्ता न दिल्यास टपरी पाडून टाकण्याची धमकी दिली.

प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये देण्यासाठी आपल्याकडे पैसे नसल्याचे पीडित महिलेने आरोपींना सांगितले. यावरून आरोपींनी पीडित महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिचा विनयभंग केला.

  • याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आळंदी पोलिसांनी संदीप आणि भरत या दोघांना अटक केली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.