BNR-HDR-TOP-Mobile

Alandi : तलवारीच्या धाकाने घरात लूटमार करणा-या पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज – तलवार, कोयते, गज, काठ्यांचा धाक दाखवून 20 ते 25 जणांनी महिलेच्या घरात तोडफोड केली. तसेच घरातून मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 1) सकाळी अकराच्या सुमारास चिंबळी येथे घडली.

शुभम शिवाजी दिवाण (वय 22), ओमकार दत्तात्रय कुंभार (वय 21), चेतन मछिंद्र भालेराव (वय 23), रेवन बचवेश्वर स्वामी (वय 24), राहुल प्रकाश लोहार (वय 23, सर्व रा. मोशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यासह त्यांच्या 15 ते 20 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उषा तुकाराम जैद (वय 50, रा. परदेशी वस्ती, चिंबळी, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम दिवाण याची उषा यांचा मुलगा भरत याच्यासोबत भांडण झाले. या कारणावरून शुभमच्या साथीदारांनी बेकायदेशीर जमाव जमवून भरत याला मारण्याच्या उद्देशाने उषा यांच्या घरात प्रवेश केला. तलवारी, कोयते, गज, काठ्यांचा धाक दाखवून उषा यांच्या घराचा दरवाजा तोडला. आरोपींनी उषा आणि त्यांचा मुलगा भरत यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

उषा याचा मोबाईल फोन आणि घरातील रोख रक्कम असा एकूण 17 हजार रुपयांचा ऐवज आरोपींनी जबरदस्तीने चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3