Alandi : कार्तिकी यात्रेनिमित्त माऊली मंदिरामध्ये फुलसजावटीची लगबग

एमपीसी न्यूज : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज 726 वा संजीवन समाधी सोहळा (Alandi) व कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदीमधील माऊलींच्या मंदिरामध्ये लाखो भाविकांच्या स्वागतासाठी फुल सजावट करण्यात येत आहे. त्याची लगबग मंदिरामध्ये दिसून येत आहे.

फुल सजावट कामगार अष्टर, झेंडू इतर विविध फुलांपासून, वस्तूपासून तोरण व विविध आकर्षक अणि नयनरम्य सजावटीच्या कामात येथे मग्न आहेत. कार्तिकी यात्रेनिमित्त मंदिराच्या महाद्वारात व मंदिरामध्ये ठिकठिकाणी आकर्षक अशी फुलसजावट करण्यात येणार आहे.

मंदिरातील आकर्षक, नयनरम्य फुलसजावट पाहून वारकरी भाविक व आळंदीकर नागरिकांचा तो कौतुकाचा विषय ठरतो. मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली गेली आहे. मंदिरामध्ये नियोजनबद्ध आरोग्य सेवा उपलब्ध करून ठेवली आहे. मंदिरामध्ये व तेथील परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.