BNR-HDR-TOP-Mobile

Alandi : रस्त्याच्या बाजूला आढळले तीन महिन्यांचे अर्भक; एक वर्षानंतर गुन्ह्याची नोंद

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – हनुमानवाडी येथील एका तलावाजवळ पाऊलवाटेच्या बाजूला झुडुपात दोन ते तीन महिन्याचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. ही घटना 17 नोव्हेंबर 2017 मध्ये घडली. त्यानंतर 2 मार्च 2019 रोजी याबाबत तब्बल एक वर्षभरानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार नितीन पांडुरंग बनकर यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलीस उपनिरीक्षक बापू जोंधळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, केळगावमधील हनुमानवाडी येथे विश्वनाथ कराडकर यांच्या शेताजवळ एक तलाव आहे. 17 नोव्हेंबर 2017 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तलावाजवळ असलेल्या पाऊल वाटेच्या बाजूला एका झुडुपात दोन ते तीन महिन्याचे स्त्री जातीचे अर्भक आढळले.

अति रडल्याने अर्भकाचा अंतर्गत आघात आणि मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला. न सांभाळण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.