Alandi : देवाच्या आळंदीत चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – देवाच्या आळंदीत चार वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने लैंगीक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 3) दुपारी साडेतीन ते चार या कालावधीत घडला.

याप्रकरणी पीडित मुलीच्या 28 वर्षीय आईने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शिवम हनुमंत ठोंबरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी पीडित चिमुकली राहत्या घराच्या इमारतीच्या खाली खेळत होती. त्यावेळी आरोपी तिथे आला. त्याने चिमुकलीला मोबाईल खेळण्यासाठी देण्याचे आमिष दाखवून खोलीत नेले. नराधमाने तिच्यावर लैंगीक अत्याचार केले असल्याचे फिर्यादी म्हटले आहे. पोलिसांनी त्याच्यावर बलात्कार आणि बाल लैंगीक अत्याचाराच (पॉक्सो) कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.