BNR-HDR-TOP-Mobile

Alandi : ‘फ्लिपकार्ट’च्या कथित प्रतिनिधीकडून ग्राहकाची एक लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – फ्लिपकार्टकडून मागवलेला टीव्ही डिलिव्हर न झाल्याने फ्लिपकार्टच्या कस्टमर केअरकडे तक्रार केली असता कस्टमर केअर विभागाच्या कथित प्रतिनिधीने ग्राहकाच्या एटीएम कार्डची माहिती घेऊन एक लाखांची फसवणूक केली. ही घटना 7 जानेवारी 2019 रोजी घडली. त्याबाबत प्राथमिक तपासानंतर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीलकंठ काशिनाथ होना (वय 33, रा. च-होली खुर्द, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार 7370954771 या मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीळकंठ यांनी फ्लिपकार्टवरून टीव्ही मागवला. तो त्यांना डिलिव्हर झाला नाही. त्यामुळे त्यांनी फ्लिपकार्टच्या कस्टमर केअरला 7370954771 या क्रमांकावर फोन करून याबाबत माहिती दिली. त्यावेळी फोनवरील प्रतिनिधीने नीलकंठ यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून एटीएम कार्डचा सीव्हीव्ही क्रमांक घेतला. त्याद्वारे आरोपीने 99 हजार 999 रुपये काढून घेतले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आळंदी पोलीस तपास करीत आहेत.
HB_POST_END_FTR-A2

.