Alandi : खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई खंडणी दरोडा विरोधी पथकाने आळंदी येथील इंद्रायणी पार्क येथे केली.

अजय मच्छिंद्र चव्हाण (वय 22, रा. इंद्रायणी पार्क, वडगाव रोड, आळंदी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक निशांत काळे यांना माहिती मिळाली की, आळंदी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यातील फरार आरोपी इंद्रायणी पार्क येथील मारुती मंदीराजवळ उभा आहे. त्यानुसार सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याला दरोडा विरोधी पथकाच्या कार्यालयात आणून कसून चौकशी केली असता त्याने आळंदी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांची कबुली दिली. त्यावरून त्याला अटक करण्यात आली. पुढील कारवाईसाठी आरोपीला आळंदी पोलिसांकडे देण्यात आले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उप निरीक्षक पुरुषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी महेश खांडे, अजय भोसले, राजेंद्र शिंदे, निशांत काळे, विक्रांत गायकवाड, नितीन खेसे, सुधीर डोळस यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.