Alandi garbage issue : आळंदी जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरच कचऱ्याचा ढीग

एमपीसी न्यूज : आळंदी जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या पुलावरील रस्त्यावरच मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा ढीग पसरलेला आढळून येत आहे. (Alandi garbage issue) या रस्त्यावरच आलेल्या कचऱ्यामुळे रहदारी करणाऱ्या वाहनांना, नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करताना नाक मुठीत धरून चालावे लागत आहे.

आळंदी जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या पुलावरील रस्त्यावरच मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा ढीग पसरलेला  आहे. हा रस्ता अरुंद असल्याने येथून ये-जा करताना नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिसरात या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.(Alandi garbage issue) परिणामी नागरिकांना या रस्त्यावरून जाताना नाक मुठीत धरून चालावे लागत आहे. तसेच सिद्धबेट बागे समोरील प्रवेशद्वारा जवळ आणि पद्मावती रस्त्यावरील  झोपडपट्टी, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पासून काही अंतरावरच कचऱ्याचे मोठे ढीग आढळून येत आहेत.

Vadgaon-Maval : शेतकऱ्यांनो ! वेळेवर कर्ज भरा आणि आपली पतपात्रता वाढवा, जिल्हा बँकेचे आवाहन 

त्यामुळे तेथील नागरिकांना सुद्धा दुर्गंधी च्या समस्येचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित ठिकाणच्या प्रशासनाने तातडीने तेथील कचऱ्याचा ढीग उचलून परिसर स्वच्छ करावा अशी त्या भागातील रहिवासी नागरिकांची मागणी आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.