Alandi : अनधिकृतपणे कंपनीत जाऊन वाहने, मशीन, कंपनीतील साहित्याची तोडफोड

एमपीसी न्यूज – अनधिकृतपणे कंपनीत जाऊन एकाने दोन वाहने, कंपनीतील मशीन आणि इतर साहित्याची तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी (दि. 8) रात्री खेड तालुक्यातील धानोरे येथील सुयोग इंजिनिअरिंग कंपनीत घडली.

राजाराम राखमाजी वाबळे (वय 50, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश गणपत काकडे (रा. धानोरे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील धानोरे येथे फिर्यादी यांची सुयोग इंजिनिअरिंग ही कंपनी आहे. शुक्रवारी रात्री पावणेआठ वाजता आरोपी अनधिकृतपणे कंपनीत आला. त्याने कंपनीतील दोन टेम्पोची तोडफोड केली.

तसेच सीएनसी मशीन, एम वन टी आर मशीन, एक कॉम्प्रेसर, वेल्डिंग अॅटॅचमेन्ट मशीन अशा चार मशीनची आणि कंपनीतील कार्यालयाची तोडफोड करून नुकसान केले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.