Alandi : आळंदी ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी त्याबद्दल समस्त आळंदीकरांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो-योगेश देसाई

एमपीसी न्यूज -विश्वस्त योगेश देसाई यांनी एका वृत्तपत्राला माहिती (Alandi )देताना आळंदीकरांचे योगदान व देवस्थानला मदत काय? असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समस्त आळंदीकर ग्रामस्थांकडून निषेध केला गेला होता.

तसेच त्यांनी ते वक्तव्य मागे घेऊन ग्रामस्थांची माफी (Alandi )मागावी अशीही मागणी करण्यात आली.दि.7 रोजी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्हाट्स अप ग्रुपवर त्या संदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे.

Pimpri : पिंपरी न्यायलायात आणखी चार न्यायाधिशांची नियुक्ती; पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश

आळंदी ग्रामस्थांच्या संदर्भात दिनांक 3 डिसेंबर रोजी माझ्याकडून अनावधानाने काही विधाने व्यक्त केले गेली त्यामुळे आळंदी ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी त्याबद्दल समस्त आळंदीकरांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.असे विश्वस्त योगेश देसाई यांनी लिहिले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.