Alandi : आळंदीत लाडक्या गणरायाचे मोठ्या जल्लोषात विसर्जन

एमपीसी न्यूज – काल (दि.28 रोजी) आळंदीमध्ये पारंपरिक ढोल ताश्यांच्या गजरात, हरिनामाच्या(Alandi) गजरात, केरळी पारंपरिक वाद्यात तर कुठे समाजप्रबोधनाच्या माध्यमातून गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक फटाक्यांच्या अतिषबाजीत मोठ्या जल्लोषात काढण्यात आली.

यावेळी  गावठाणातील धर्मराज प्रतिष्ठाण गणेश मंडळाने सादर केलेल्या केरळी वाद्याने गणेश भक्तांची मने  जिंकली. तर जय गणेश ग्रुप यांनी सादर केलेला विठू माझा लेकुरवाळा  जिवंत देखावा (संतांनी केलेले समाजप्रबोधन)   तसेच जय गणेश प्रतिष्ठाण यांनी सोशल मीडिया एक दुधारी शस्त्र हा समाजप्रबोधनपर जिवंत देखावा सादर केला.

एकलव्य प्रतिष्ठाण यांनी फुलसजावट देखावा, आकर्षक झांज पथक खेळ, ढोल ताशे , व्यापारी तरुण मंडळ आकर्षक शिव चित्ररथ, आकर्षक झांज पथक खेळ, ढोल ताशे, शिवतेज मित्र मंडळ, दत्त नगर प्रतिष्ठाण, न्यु दत्त नगर ग्रुप, अखिल भाजी मंडई मंडळ, पद्मावती मित्र मंडळ,
ज्ञानराजा मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ शौर्य ग्रुप, श्री सुवर्णयुग प्रतिष्ठाण (Alandi) यांनी ढोल ताशे  व आकर्षक सजावट,देखाव्या सह आकर्षक विद्युत रोषणाई, शिवस्मृती प्रतिष्ठाण भव्य गणेश मूर्ती  ढोल ताशे ,तर गावातील एका मंडळाने गणरायाची पालखी सह ढोल ताशे ,माऊली पार्क बाल मित्र मंडळ ढोल ताशे  इ.सादरीकरण करत गणेश मंडळांनी शहरात मोठी रंगत आणली.

काही घरगुती गणपती,गणेश मंडळाने व वारकरी संस्थेने  ही टाळ मृदुंगाच्या गजरात,हरिनामाच्या गजरात मिरवणूक काढली. गणरायाची विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी  हजारो गणेश भक्त (Alandi) उपस्थित होते. चाकण चौकातील अमरदिप मित्र मंडळाने यावेळी सर्व गणेश मंडळांचा सन्मान केला.

मिरवणूकी दरम्यान शहरात आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त होता. तर दिघी आळंदी वाहतूक विभागामार्फत योग्य त्या रित्या वाहतुकीचे नियोजन होते. आळंदी पालिका संकलन केंद्रात अनेक भाविकांनी विधीपूर्वक मूर्तीदान केल्या.

यावेळी पालिका आधिकारी वर्ग ,कर्मचारी वर्ग तसेच अग्निशमन दल विभाग कर्मचारी हे वरिष्ठ अधिकाऱ्याने नेमून दिलेली कार्य बजावत होते. मिरवणूकी दरम्यान दुपारी व सायंकाळी काही वेळ पावसाने हजेरी लावली.या भर पावसात ही ढोल ताशे वादकांनी (Alandi)  वाद्ये वाजवली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.