Alandi : आळंदीमध्ये बैल पोळा उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : आळंदीमध्ये भाद्रपद बैल पोळा (Alandi) मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. लम्पीच्या सावटामुळे यावर्षी हा सण बहुत करून घरगुती पद्धतीने साजरा करण्यात आला असला, तरी बैलांना धुवून आकर्षक रित्या सजवून त्यांची संध्याकाळी पूजा करण्यात आली.

Today’s Horoscope 26 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

तसेच, बैलपोळ्यानिमित्त आळंदीमध्ये चौका चौकात मातीच्या बैलांची विक्री सुरू होती. लहान-मोठ्या मातीच्या बैलाच्या किंमती शंभर रुपयापासून ते दोन हजारापर्यंत होत्या. पुरातन काळापासून शेती आणि बैलजोडी असे समीकरण रुजलेले आहे. शेतीच्या अनेक कामांमध्ये बैलांचा खूप मोठा वाटा असतो. त्यामुळे वर्षभर शेतामध्ये राबणार्‍या बैलांविषयी कृतज्ञता म्हणून प्राचीन काळापासून आपल्याकडील भागाकडे भाद्रपदी अमावास्येला बैलपोळा हा सण साजरा केला जातो. भाद्रपदी बैलपोळा सण आपल्या पुणे जिल्ह्यात मोठ्या थाटात (Alandi) साजरा होत असतो. तसेच, घरोघरी मातीच्या बैलांचे पूजन केले जाते. पूजन केल्यानंतर त्यांना गोड पुरण पोळी, गुळवणी, भात, आमटी, भजी इ. नैवेद्य दाखवला जातो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.