Alandi News : इंद्रायणी जलप्रदूषणाची माहिती मुख्यमंत्री कार्यालयात – अक्षय महाराज भोसले

एमपीसी न्यूज : सलग दोन दिवस आळंदी येथील इंद्रायणी नदीपात्र रसायनयुक्त फेसाने फेसाळले आहे. याची दखल धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी घेतली आहे. पिंपरी-चिंचवड हद्दीतील,नदी काठी गावांतील कंपन्याचे रसायनयुक्त पाणी, (Alandi News) सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जाते याबाबत अक्षय महाराज भोसले यांनी पिंपरी-चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला.तसेच इंद्रायणी नदीच्या संवर्धनाबाबत चर्चा केली.

Pune News : अभया महिलांच्या हस्ते गणेशयाग

इंद्रायणीचे पावित्र्य राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. इंद्रायणीचे पावित्र्य संप्रदायाच्या अस्मितेचा भाग आहे. मुख्यमंत्री कार्यालयात देखील इंद्रायणी जलप्रदूषण संबंधित माहिती दिली आहे. इंद्रायणी नदी स्वच्छते बाबत मुख्यमंत्री मार्ग काढतील. (Alandi News) इंद्रायणी नदी स्वच्छते बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवेदनशील आहेत.याबाबत ची माहिती धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.