मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Indrayani ghat : महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त इंद्रायणी घाट स्वच्छता मोहिम

एमपीसी न्यूज : दि.2 ऑक्टोबर रोजी आळंदी येथील इंद्रायणी घाट परिसर स्वच्छ करून महात्मा गांधी व स्व.पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती येथे साजरी करण्यात आली. (Indrayani ghat) गेली 40 वर्ष इंद्रायणी घाट स्वच्छतेचे कार्य करत असणारे विश्व सामाजिक संस्थेचे पिराजी नेवसे नाना व त्या संस्थेचे स्वयंसेवक येथे उपस्थित होते.त्यांना या स्वच्छते बदल इंद्रायणी फाउंडेशन च्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

त्यांनी आज ही दि.2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त विश्व सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकां समवेत इंद्रायणी घाट स्वच्छ केला.(Indrayani ghat) याबाबतची माहिती विठ्ठल शिंदे यांनी दिली. तसेच आळंदी नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषद कार्यालयात महात्मा गांधीजी व स्व.पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी येथे आळंदी नगरपरिषद कर्मचारी व विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Shikrapur girl murder : बापानेच घेतला पोटच्या मुलीचा जीव, 5 दिवसानंतर नदीत सापडला मृतदेह

नेवासे महाराज यांनी देशाचे स्वातंत्र्यात राष्ट्र पुरुषांचे योगदान आणि सद्याची स्थिती यावर प्रबोधन केले. भारत बलवान सामर्थ्यवान होत आहे. अमेरिकेच्या तोडीस भारताची प्रगती होत असून अवघ्या ७५ वर्षात भारताने केलेली प्रगती वाखाणण्या सारखीच आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माध्यमातून भारत लवकरच विश्व गुरु होईल असा आशा वाद यावेळी  भागवत आवटे यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर म्हणाले, महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती 2 ऑक्टोबर रोजी देशभरात साजरी केली जाते. गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला होता. मोहनदास करमचंद गांधी सत्य आणि अहिंसेचे पुजारी होते. त्यांनी जगाला अहिंसेचा मंत्र दिला.या अहिंसेच्याच बळावर भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे गांधीजी आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. इंद्रायणी नदीघाटावर वंदे मातरम च्या घोषणा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

इंद्रायणी घाटावरील महात्मा गांधी रक्षा विसर्जन स्मृती स्तंभ येथे महात्मा गांधी व स्व.पं. लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त विविध राजकिय व सामाजिक संघटनेनी त्या स्मृती स्तंभाला पुष्पहार अर्पण करून (Indrayant ghat) अभिवादन केले. यावेळी स्वच्छ अभियान खेड अध्यक्ष पांडुरंग ठाकूर,अर्जुन मेदनकर ,विष्णू कुऱ्हाडे, योगेश बोडके,प्रकाश बनकर हे उपस्थित होते.तसेच येथे अभिवादनासाठी महाविकास आघाडीचे नेते नंदकुमार वडगांवकर,सचिन घुंडरे, रुपालीताई पानसरे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest news
Related news