Alandi : भाड्याने खोली घेण्यासाठी आलेल्या महिलेने चोरले 73 हजारांचे दागिने

एमपीसी न्यूज – खोली भाड्याने घेण्यासाठी आलेल्या महिलेने मालकाच्या नकळतपणे खिडकीत ठेवलेली चावी घेऊन 73 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. असा संशय घरमालकाने व्यक्त केला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 22) सकाळी अकरा ते बारा या कालावधीत आळंदी येथे घडली.

याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अज्ञात महिला फिर्यादी यांच्या घरी भाड्याने खोली घेण्यासाठी आली होती. महिलेने खोलीची पाहणी करत असताना फिर्यादी यांनी एका खिडकीत घराची चावी ठेवली होती. ती अज्ञात महिलेने घेऊन घरातील लाकडी शोकेसमधून 73 हजार रुपये किमतीचे तीन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.