Alandi : कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीमध्ये लाखो भाविक दाखल

एमपीसी न्यूज – आज ( दि.9 ) कार्तिकी एकादशी निमित्त लाखो (Alandi ) भाविक संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनाकरिता आळंदीमध्ये दाखल झाले आहेत. नदी पलीकडील वैतागेश्वर लगत असणारा दर्शन मंडप वारकरी भाविकांनी पूर्ण भरून दत्त आश्रम लगत पर्यंत दर्शन रांग गेल्याचे सकाळी नऊ वाजता दिसून आले होते.

CICSE : सीआयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

इंद्रायणी घाटावरती स्नानाकरीता प्रचंड गर्दी वारकरी भाविकांनी केली होती. खांद्यावर पताका, डोईवर तुळशी वृंदावन, मृदुंगाचा लयबद्ध ताल,टाळांचा नाद, फुगडी व नृत्यात रममाण होत,अनेक संत महात्मे व देवतांच्या पालख्या घेऊन, ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात दिंड्या नगर प्रदक्षिणा पूर्ण करत होत्या. सर्वत्र शहरात ज्ञानोबा माऊलीचा , हरिनामाचा जयघोष ऐकू (Alandi ) येत होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.