Alandi : एम. आय. टी. संत ज्ञानेश्वर बी. एड. कॅालेज चे प्राचार्य डॅा. सुरेंद्र हेरकळ यांना महात्मा फुले शिक्षणरत्न पुरस्कार

एमपीसी न्यूज : – अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद आयोजित (Alandi)महात्मा फुले साहित्य संमेलनात प्राचार्य डॅा. सुरेंद्र हेरकळ यांना महात्मा फुले शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॅा. सुरेंद्र हेरकळ हे आळंदी येथील एम. आय. टी. संत ज्ञानेश्वर बी. एड . कॅालेज चे प्राचार्य आहेत. त्याची ११ पुस्तके प्रकाशित झाली असून ते मागील १८ वर्षापासून शिक्षणशास्त्रात कार्यरत आहेत .

Bhosari : पार्किंगमधून बस बाहेर काढत असताना एकाला धडक, अपघातात जखमीचा मृत्यू

५२ पेक्षा जास्त शोधनिबंध हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर (Alandi) प्रकाशित झाले आहेत. अनेक विद्यापीठांत ते विविध समितीवर काम करतात. या पूर्वी त्यांना २१ पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. आता पर्यंत डॅा. हेरकळ यांना १६ पदवी मिळविलेल्या आहेत. ६ विद्यार्थी हे पीएच. डी. चे मार्गदर्शन घेत आहेत. त्यांनी नुकताच भिमाशंकर येथील भोरगिरी परीसरातील लोकोंसाठी प्रोजेक्ट परक्युलेशन एज्युटॅक २.० हा उपक्रम राबविला जो महात्मा फुले यांच्या शिक्षणाच्या पाझर सिध्दांतावर आधारित होता .

 

 या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी त्यांना महात्मा फुले शिक्षणरत्न या पुरस्काराने सन्मानित करताना आनंद होत असल्याचे संशोधन परिषदेचे सहसचिव  देविदास झुरंगे यांनी सांगितले.याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share