Alandi Padmavati Mata : आळंदी मधील पद्मावती माता ज्योतिबाच्या मनमोहक स्वरुपात सजली

एमपीसी न्यूज : 2 ऑक्टोबर रोजी अश्विन शुद्ध नवरात्राच्या सप्तमी तिथीला श्री पद्मावती माता श्री ज्योतिबाच्या मनमोहक रूपात सजली होती.(Alandi Padmavati Mata) पद्मावती मातेच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक अशी केळीच्या पानांची व पुष्पांची सजावट करण्यात आली होती. पद्मावती मातेचे श्री ज्योतिबाच्या स्वरूपात सजलेले रूपाचे दर्शन घेण्यासाठी येथे भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Hockey Tournament : 16 वर्षांखालील हॉकी स्पर्धा, गतविजेत्या सेल अकादमीला सुखजीवन संघाने बरोबरीत रोखले

यावेळी मंदिर गाभाऱ्यातील सजावटी मुळे मंदीराच्या द्वारातच श्री पद्मावती मातेच्या चरण पादुका ठेवून त्याचे दर्शन ठेवण्यात आले होते.(Alandi Padmavati Mata) याबाबतची माहिती पदमराज रानवडे यांनी दिली. पूर्वी पासून आळंदीतील रानवडे कुटूंबियांना येथील पद्मावती मातेच्या मंदिरात पद्मावती मातेची सेवा करण्याचा मान आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.