Alandi : माऊली मंदिरात रामनवमी निमित्त चंदन उटीद्वारे साकारले शिंदेशाही रूप

एमपीसी न्यूज :  आळंदी येथे 30 मार्च रोजी श्रीराम नवमीच्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधीवर चंदन उटीद्वारे शिंदेशाहीचे  मनमोहक रूप साकारले (Alandi) असून ते पाहण्यासाठी अनेक भाविकांनी मंदिरा मध्ये गर्दी केली होती.अभिजित धोंडफळे, उमा धोंडफळे, मोरेश्वर जोशी यांनी  देवस्थानच्या सहकार्याने ही चंदन उटी साकारली.

याबाबत माहिती देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.तसेच माऊलीं  मंदिरा मध्ये रामनवमी निमित्त आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली होती.

Talegaon Dabhade : फिजिकल थिएटर” विषयी जाणून घेत कलापिनीत जागतिक रंगभूमी दिन साजरा

श्री राम जन्मा निमित्ताने माऊलींच्या मंदिरा मध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती.श्री राम जन्म मोठ्या उत्साहात माऊलीं मंदिरासह विविध ठिकाणी असणाऱ्या राम मंदिरात साजरा करण्यात आला.(Alandi) श्री राम जन्मा नंतर भाविकांना तेथे  प्रसादाचे वाटप करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.