Alandi : माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या दीड महिन्यावरती असताना इंद्रायणी नदी पुन्हा जलप्रदूषणाने फेसाळली

एमपीसी न्यूज –  इंद्रायणी नदी काठच्या गावातील मैला मिश्रित  ( Alandi ) सांडपाणी तसेच कारखान्यातील केमिकल युक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट ते सांडपाणी इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. यामुळे इंद्रायणी नदी जलप्रदूषणाने  फेसाळलेली दिसून येत आहे. दि.13 मे  रोजी  आळंदी येथील सिध्दबेट जवळील बंधाऱ्या खालील नदीपात्र मोठ्या प्रमाणात फेसाळलेले दिसून आले होते.यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.तर काल दि.14 रोजी व आज दि.15 रोजी सकाळी काहीश्या प्रमाणात नदीपात्र प्रदूषित पाण्याने फेसाळलेले होते.

Talegaon Dabhade : अरेच्चा! चक्क माजी आमदारांचे नाव मतदार यादीतून वगळले

 

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा  अवघ्या दीड महिन्यावरती आलेला आहे. अश्यातच गेली दोन तीन दिवस इंद्रायणी नदी प्रदूषणाने फेसाळलेली दिसून येत आहे.राज्यातून लाखो भाविक आळंदीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज  पालखी प्रस्थान सोहळ्या करिता येत असतात.राज्यातून विविध ठिकाणावरून आलेल्या  वारकरी भाविकांना या नदी प्रदूषणाबाबत पुरेशी  माहिती नसल्याने या नदीतील जल पवित्र तीर्थ म्हणून काही आचमन करत असतात.यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

तसेच त्यांना त्वचा रोग होण्याचा धोका संभवतो व या नदीतील जल प्रदूषणाने नदी पात्राजवळील कुपनलिकांवर परिणाम होतो. ते सुद्धा जल प्रदूषित होऊन पिण्यास अयोग्य होते. सद्यस्थितीत सिध्दबेट जवळील बंधाऱ्यातुन  हिवळसर व पिवळसर असे प्रदूषित पाणी नदीपात्रात पडत असताना ( Alandi ) दिसत आहे. जलप्रदूषण होऊ नये यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने योग्य ती उपाय योजना करावी व जलप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.