Alandi : ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात हरिनामाच्या गजरात माऊलींचा रथोत्सव संपन्न

एमपीसी न्यूज : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (Alandi) यांचा रथोत्सव आळंदीमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात, खांद्यावर पताका घेत, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन हरिनामाच्या गजरात, ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात असा संपन्न झाला. रथोत्सवानिमित्ताने संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीने गोपाळपुरा मंदिराकडे प्रस्थान केले.

गोपाळपुरा मंदिरा येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज रथोत्सवसाठी रथात विराजमान झाले. यावेळी रथाची आकर्षकरीत्या फुलसजावट करण्यात आली होती. माऊलींच्या रथाने गोपळपुरा, चाकण चौक, भैरवनाथ चौक, लक्ष्मीआई चौक, श्री विठ्ठल रुक्मिणी चौक, नगरपालिका चौक, शिवतेज चौक, महाद्वार चौक अशी परिक्रमा केली.

Vadgaon Maval : धोकादायक वळणांवर बहिर्वक्र आरसे

त्यानंतर रथातून रात्री 8 वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमध्ये (Alandi) विराजमान झाले व माऊली मंदिरामध्ये प्रवेश केला. यावेळी पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त होता. यावेळी पालखी सोहळामालक, व्यवस्थापक, मानकरी, सेवेकरी, पुजारी, आळंदीकर ग्रामस्थ आणि भाविक भक्त‌ बहुसंख्येने उपस्थित होते. रात्री 9 ते 11 यावेळेत हभप केंदूरकर महाराज यांचे किर्तन परंपरेनुसार विनामंडपात संपन्न होणार आहे. रात्री 11 नंतर खिरापत पूजा विश्वस्तांकडून करण्यात येईल. नंतर प्रसाद वाटप वीणामंडपात होईल. फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.