Alandi : पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी 5 व 6 एप्रिलला ‘मीडिया रिफ्लेक्शन’ इव्हेंटचे आयोजन

एमपीसी न्यूज – आळंदी येथील एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या मास कम्युनिकेशन विभागाने मास कम्युनिकेशन व पत्रकारिता या क्षेत्रात करिअर निवडू (Alandi) इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी  5 व 6 एप्रिलला “मीडिया रिफ्लेक्शन” या इव्हेंटचे आयोजन रोजी करण्यात आले आहे.

 

‘मीडिया रिफ्लेक्शन’मध्ये डॉक्युमेंटरी कशी बनवावी, न्यूज बुलेटिन कसे कव्हर करावे, मुलाखत कशी घ्यावी, न्यूज रिपोर्टिंग कसे करावे इत्यादी इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे.

 

एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये सर्व आवश्यक तांत्रिक सुविधांसह आधुनिक  टेलिव्हिजन स्टुडिओ आहे. महाविद्यालयात अनुभवी शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आहेत.(Alandi)  या इव्हेंट मध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्याना  मास कम्युनिकेशन विषयाची व्यावहारिक कौशल्ये कशी आत्मासात करावीत, या विषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

PCMC : एमआयडीसीतील ‘मिक्स’ कचरा उद्यापासून उचलणार नाही – आयुक्त सिंह

 

विविध  महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा दाखवण्यासाठी ‘मीडिया रिफ्लेक्शन’ या इव्हेंटमध्ये  सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. बी. बी. वाफारे यांनी केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त  गुणांची देवाण-घेवाण होईल. सदर इव्हेंट आयोजन  कॉलेज कॅम्पसमध्ये करण्यात आले आहे.

 

ज्येष्ठ पत्रकार, संपादक व  माध्यम तज्ज्ञ  समीरन वाळवेकर “जनसंवाद आणि पत्रकारितेतील करिअरच्या संधी” या विषयावर बोलतील.  (Alandi) मराठी अभिनेते पुष्कराज चिरपुटकर, होस्ट “रोल ऑफ सोशल मीडिया आणि नवोदित कलाकार/कलाकारांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म” मीडिया रिफ्लेक्शन इव्हेंट आणि स्पर्धा उपक्रम यावर बोलणार आहेत.

 

लाँच – आगाज़, टॅलेंट हंट- जलवा शो, छायाचित्रण स्पर्धा- कथा कॅमेरा की ज़ुबानी, जाहिरात प्रश्नमंजुषा- पूछो तो जानो, लघुपट आणि माहितीपट स्पर्धा – मला काही म्हणतेय आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती संबंधित विभाग प्रमुख यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.