Alandi : मरकळ येथील दारूभट्टीवर छापा

एमपीसी न्यूज – आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरकळ येथील गावठी दारूच्या भट्टीवर आळंदी पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारूचे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरकळ येथे गावठी दारूभट्टी सुरु असल्याची माहिती आळंदी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दारूभट्टीवर छापा टाकला. यामध्ये सुमारे 200 लिटर दारू बनविण्याचे कच्चे रसायन आणि साधने असा एकूण 3 हजार 500 रुपये किंमतीचा माल मिळून आला. सर्व माल पोलिसांनी जागीच नष्ट केला आहे.

पुढील काळात देखील अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर पोलिसांचे लक्ष असणार आहे. अवैध धंद्यांवर लक्ष ठेऊन कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.