Alandi : एमआयटी बी. एड. कॉलेजमध्ये रविवारी शिक्षक भरती महामेळावा

एमपीसी न्यूज – आळंदी येथील एमआयटी संत ज्ञानेश्वर बी. एड. कॉलेजमध्ये रविवारी (दि 23) सकाळी 11 ते 5 यावेळेत शिक्षक भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या 15 पेक्षा जास्त शालेय संस्था सहभागी झाल्या आहेत.

यात 100 पेक्षा जास्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक पदांसाठी ही भरती प्रक्रिया ” शिक्षक भरती महामेळावा” यातून करण्यात येणार आहे.

तरी इच्छुक व पात्र डीएड., बीएड. व एमएड. उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना अर्जासोबत आवश्यक मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रति सोबत ठेऊन उपस्थित रहावे, असे आवाहन संत ज्ञानेश्वर बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.