Alandi : शिक्षण, अध्यात्म आणि संशोधनाद्वारे सदभावना निर्मिती – प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ

एमपीसी न्यूज- शिक्षण, अध्यात्म आणि संशोधनाद्वारे संपूर्ण विश्वामध्ये सदभावनेची सहनिर्मिती होऊ शकते असे मत डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी व्यक्त केले. आळंदी येथील एम.आय.टी बीएड कॉलेजमध्ये दोनदिवसीय राज्यस्तरीय शैक्षणिक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

या परिषदेचे उदघाटन ब्रम्हकुमारी संस्थेच्या राजयोगिनी बी.के. सरितादीदी यांच्या हस्ते झाले. यावेळी एमआयटी ए. टी .डी. विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. आसावरी भावे, आदर्श कॉलेजच्या प्राचार्या डॉ. ललिता वर्तक, वारकरी शिक्षण संस्थेचे हभप ज्ञानेश्वर शिंदे, एसएनडीटी विद्यापीठाचे डॉ.भास्कर इगवे, मुंबई विद्यापीठाचे डॉ.चेतन चव्हाण, श्रीराम बीएड कॉलेज चे प्राचार्य डॉ .सागर काकडे व परिषद समन्वयक डॉ. अर्पिता भट्ट तसेच वारकरी शिक्षण संस्थेचे आणि बीएड महाविद्यालयातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

सारितादीदींनी यांनी स्वप्रती सदभावनेद्वारे विश्वामध्ये सदभावनेची निर्मिती कशी करावी हे राजयोगाच्या प्रयोगाद्वारे स्पष्ट केले. या परिषदेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे डॉ.सुभाष सोनुने, दहिवडी कॉलेज सातारा येथील प्रा.विजय पाटोळे, मंचर बीएड कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलास दौंडकर यांची सदभावना या विषयावर व्याख्याने झाली. या परिषदेत 12 विद्यापीठातील एकूण 54 संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले.

गुरुकुल प्रतिष्ठानचे डॉ.अजयचंद्र भागवत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ.निशा वळवी, डॉ.वैभव जाधव, जेएसपीएम कॉलेजचे प्राचार्य डॉ.खुशाल मुंढे, हभप तुकाराम मुळीक यांच्या सदभावना निर्मिती या विषयावरील व्याख्यानाने परिषदेची सांगता झाली. सूत्रसंचालन प्रा.संजय शिंदे यांनी तर आभार प्रा. गंगोत्री रोकडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.