Alandi : सिद्धबेटामध्ये एमआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज : आळंदी (Alandi) येथील सिद्धबेट संत निवृत्ती, संत ज्ञानेश्वर, संत सोपान  व संत मुक्ताई यांचे वास्तव स्थान आहे. ते येथे पर्णकुटीमध्ये राहत होते.

त्यांची कर्मभूमी, लिलाभूमी म्हणून सुद्धा ही भूमी ओळखली जाते. तसेच ऋषीमुनींनी देखील या पूर्वी या भूमीमध्ये तप केले आहे. यामुळे या पवित्र भूमीच्या दर्शनासाठी अनेक भाविक नागरिक येथे येतही असतात.

या पवित्र भूमीच्या परिसरात एम आय टी अकॅडमी ऑफ इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवले. यामध्ये अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते.

त्यांनी वॉकिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक लगत तेथील इंद्रायणी नदीपात्राजवळील पूर्णकुटी जवळील परिसर इ. ठिकाणी त्यांनी स्वच्छता कार्य केले. सिद्धबेटमधील विविध भागातील परिसरातील प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या इ. कचरा विद्यार्थ्यांनी एकत्र संकलन केला. तो कचरा यावेळी मोठ्या डसबिनमध्ये टाकण्यात आला.

तद्नंतर तो पालिकेच्या घंटा गाडीकडे टाकण्यात आला. याबाबत माहिती पालिकेचे सुरक्षा कर्मचारी मारुती सोळंके यांनी दिली. स्वच्छता अभियान राबवणाऱ्या या विद्यार्थ्यांचे अनेक स्तरातून कौतुक होत आहे.

Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 40 – विजयता पंडित

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.