Alandi : आळंदीमध्ये एम. आय. टी. तर्फे दोन दिवसीय ” कॉमर्स वीक” साजरा

 एमपीसी न्यूज : एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आळंदी, पुणे यांच्या कला आणि वाणिज्य विभागाने  ‘जनरेशन झेडया थीमसह वार्षिक आंतरमहाविद्यालयीन कॉमर्स वीकआयोजित केला होता. या कार्यक्रमात सात वेगवेगळ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोदवला कॉमर्स वीक मधे 2000 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता.(Alandi) कॉमर्स वीकचे उद्घाटन अभिनेते भाऊ शिंदे आणि अभिनेत्री नेहा सोनवणे रव्दळ या मराठी चित्रपटाच्या टीमच्या हस्ते करण्यात आले.

कॉमर्स वीक 2023 मध्ये क्रीडा आणि मनोरंजन क्रियाकलापांसह अनेक वाणिज्य आधारित उपक्रम आयोजित केले गेले. विद्यार्थी समुदायाला उद्याच्या वाणिज्य आणि व्यापार समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिक अनुकूल बनण्यास मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण कार्यक्रम प्रदान करणे आणि देशाला आवश्यक असलेल्या पुढच्या आधुनिका पिढीला तयार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

Alandi : माऊली मंदिरात रामनवमी निमित्त चंदन उटीद्वारे साकारले शिंदेशाही रूप

यावेळी प्रकल्प संचालक विजय खोडे उपप्राचार्या डॉ.मानसी अतितकर आणि प्रा.अक्षदा कुलकर्णी आणि विभाग प्रमुख डॉ. पद्मावती उंडाळे कुलसचिव  संदीप रोहिणकर, विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रम नियोजन प्रा.प्रवीण खरात व प्रा.सुरेखा गायकवाड यांनी केले आणि प्रा.दिक्षा कदम,(Alandi) डॉ.अर्चना आहेर, प्रा. अभिजित नेटके, डॉ. अनिल स्वामी, प्रा. जी.बी.सिंग, प्रा. पल्लवी घुगे यांच्यासह विद्यार्थी समन्वयक आर्या भागवत, कांचन म्हेत्रे तसेच विद्यार्थ्यांनी कष्ट घेतले. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे मार्गदर्शन लाभले.

या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना उपप्राचार्य व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे प्राचार्य, शिक्षक तसेच प्रमुख पाहुण्यांनी खूप कौतुक केले.याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.