Alandi : हातउसने घेतलेल्या पैशांवरून घेतला गालाचा चावा

एमपीसी न्यूज – हातउसने घेतलेले पैसे मागताना सावकाराने एका कर्जदाराच्या गालाचा चावा घेतला. तसेच त्याच्या पत्नीस मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 30) रात्री साडेआठच्या सुमारास खेड तालुक्यातील कोयाळी येथे घडली.

अमोल पांडुरंग पवळे (वय 35, रा. कोयाळी, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संदीप रंगनाथ गायकवाड, रंगनाथ किसन गायकवाड (दोघे रा. रानमळा कोयाळी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल यांनी आरोपींकडून हातउसने पैसे घेतले होते. त्यावरून आरोपींनी अमोल आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व काठीने मारहाण केली. त्यानंतर आरोपी संदीप याने अमोल यांच्या उजव्या गालाचा चावा घेऊन दुखापत केली. उसने घेतलेले पैसे दिले नाहीत तर जीवे मारण्याची धमकी देखील आरोपींनी दिली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.