Alandi : आळंदी नगरपरिषदेचे विशेष करवसुली अभियान 2023; सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांची जनजागृती

एमपीसी न्यूज : आळंदी नगरपरिषदे मार्फेत नगरपरिषदेचे (Alandi) मालमत्ता कर व पाणी पट्टी भरणा करण्यासाठी पालिका आधिकारी व कर्मचारी सोशल मीडियाच्या माध्यमातून करदात्यांची जन जागृती करताना दिसून येत आहे.
पालिकेचे मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरणा करण्यासाठी पालिकेच्या फेसबुक पेजवर विशेष करवसुली अभियान 2023 आत्मपरीक्षण करा ही पोस्ट प्रसारीत करून त्यामध्ये नागरिकांसाठी दैनंदिन गरजेच्या असणाऱ्या गोष्टींचा समावेश करत त्यावर प्रश्न करत संबंधित गोष्टींचा भरणा न केल्यास होणारे परिणामांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
यामध्ये आपण लाईट बिल न चुकता भरता का? वीज कनेक्शन बंद करतील. टीव्ही केबलचे मासिक भाडे भरता का ?टीव्ही बंद होईल. इंटरनेट रिचार्ज करता का?इंटरनेट सेवा बंद होईल.(Alandi) गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरता का?प्रवास बंद होईल. शेतसारा भरता का? 7/12 खाते उतारा मिळणार नाही. परीक्षा /ट्युशन फी भरता का? नापास होण्याची भीती.इ. तर मग घरपट्टी व पाणीपट्टी वेळेत का भरत नाही?कर तर भरावाच लागेल पण वेळ महत्वाची 31 मार्च 2023.
नगरपरिषदेचे मालमत्ता कर,पाणीपट्टी भरणा करून सुजाण नागरिक बनुयात आपल्या शहराच्या नागरी सुविधांच्या विकासात सहभागी होऊयात कर भरा कटुता टाळा. (Alandi) अश्या प्रकारे फेसबुक ,वॉट्स अप च्या माध्यमातून सध्या पालिकेची कर भरणा करण्यासाठी जनजागृती चालू आहे. तसेच घरपट्टी व पाणीपट्टी भरणा करण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करत (कर)पैसे भरण्याची सुविधा सुध्दा पालिके मार्फत उपलब्ध आहे.