Alandi: एन.एम.एम.एस. परीक्षेमध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे यश

एमपीसी न्यूज-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे मार्फत दि. 24 डिसेंबर 2023रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल(Alandi) घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेमध्ये आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. शुक्रवार दि. 12 एप्रिल रोजी परीक्षेचा अंतिम निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर झाला.
एन.एम.एम.एस. परीक्षेमध्ये विद्यालयातील कु. यश किसन टोणपे, कु. शिंदे आकाश रामचंद्र व कु. गोरक्ष सुरेश राख (Alandi)हे तीन विद्यार्थी निवडयादी मध्ये आले तर सारथी शिष्यवृत्तीमध्ये तीस विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सदर एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना वर्षाला रु. 12000/- व सारथी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना वर्षाला रु. 10000/- असे पाच वर्षापर्यंत मिळतात. सदर परीक्षेसाठी नारायण पिंगळे यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, किसन राठोड, सर्व शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.