Alandi News : श्री संत ज्ञानेश्वर महाराज शेतकरी सहकार विकास पॅनेलचे वि. वि. सेवा सहकारी सोसायटी वर वर्चस्व

एमपीसी न्यूज-काल ( दि.26)आळंदी येथे आळंदी विविध (Alandi News ) विकास सहकारी संस्थेची निवडणूक पार पडली.या निवडणुकीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज शेतकरी सहकार विकास पॅनेलचे सर्वसाधारण गटामध्ये  दिलीप मुंगसे (220 मत), बाबूलाल घुंडरे (217मत), ज्ञानेश्वर घुंडरे (198 मत), सोमनाथ मुंगसे (196मत), अनिल भांडवलकर (183मत) हे उमेदवार विजयी झाले .

तर महिला वर्गा मध्ये अरुणा घुंडरे ( 260मत) , सिंधुबाई कुऱ्हाडे (239मत) या  महिला उमेदवार विजयी झाल्या.इतर मागास प्रवर्गातून संतोष वीरकर (202मत) उमेदवार विजयी झाले व अनुसूचित जमाती मधून सुभाष सोनवणे हे  बिनविरोध निवडून आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज शेतकरी सहकार विकास पॅनेलचे एकूण 9 उमेदवार विजयी झाले.

 

 

Alandi News : मानवता धर्म शिकविणारा भारताचा आध्यात्मिक विचार जगात श्रेष्ठ-सुधीर मुनगंटीवार

तसेच श्री माऊली कृपा/श्री रघुनाथ महाराज शेतकरी विकास पॅनल चे सर्वसाधारण गटातून रोहिदास मुंगसे (217मत), वासुदेव मुंगसे (206 मत) , विलास घुंडरे( 189मत) हे उमेदवार विजयी झाले. तर विशेष मागासवर्गीय वर्गातून राहुल चिताळकर हे बिनविरोध निवडून आले.श्री माऊली कृपा/श्री रघुनाथ महाराज शेतकरी विकास पॅनल चे एकूण 4 उमेदवार विजयी झाले.

 

निवडणूक बिनविरोध होण्याकरिता अनेक बैठका झाल्या होत्या. परंतु त्या अयशस्वी झाल्या. या निवडणुकीत केळगाव मधील 7 उमेदवार विजयी झाले असून आळंदी मधील 6 उमेदवार विजयी झाले आहेत.

काही अवैध झालेल्या मतदानामुळे व  क्रॉस वोटिंग मुळे कुऱ्हाडे यांच्या उमेदवारांचा पराभव झालेला दिसून आल्याची चर्चा गावामध्ये होती. या निवडणुकीमध्ये केळगावकर व घुंडरे यांची रणनीती शेवटच्या टप्प्यात (Alandi News) निर्णायक ठरली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.