Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयात गणेश चतुर्थी निमित्त ज्ञानेश्वरीतील गणेशाच्या ओवी पठणाचा नवा उपक्रम

एमपीसी न्यूज : आळंदी येथील (Alandi) श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये सर्वधर्मसमभाव, एकात्मता, संघभावना, सहकार्य अशा अनेक नैतिक मूल्यांची रुजवन करण्या हेतू गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर गणरायाचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करून संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, शिक्षकेतर प्रतिनिधी शिवाजी जाधव समवेत रामदास वहिले, श्रीधर घुंडरे, संजय कंठाळे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे यांच्या शुभहस्ते गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
सार्वजनिक गणेशोत्सव आणि आपल्या घरातील गणेश उत्सव संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सोबत साजरा करूया असे सांगत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायात ओवी क्रमांक एक ते वीस या ओव्यांमध्ये आपल्या गणपती बाप्पांचे ओंकारमय सकलार्थ मतीप्रकाशू वर्णन केलेले आहे.
Alandi : आळंदीत गणरायाचे उत्साहात आगमन
दररोज सकाळी आरती झाल्यानंतर या वीस (Alandi) ओव्यांचे वाचन गणपती बाप्पांच्या समोर करूया आणि ज्ञानेश्वरीच्या अमृतमय ओव्यातून श्री गणपती बाप्पांची स्तुती करूयात असे आवाहन ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या परिवाराच्या वतीने श्रीधर घुंडरे यांनी आपले विचार व्यक्त केले.
या उपक्रमाची सुरुवात श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत गणेश मूर्तीची स्थापना झाल्यानंतर गणपतीची आरती करण्यात आली व त्यानंतर ज्ञानेश्वरीतील एक ते वीस ओव्यांचे तालासुरात वाचन करण्यात आले.
यानिमित्ताने अजित वडगांवकर यांनी संस्थेत गणपती स्थापनेची परंपरा विषद करत विघ्नहर्ता गणरायाकडे अंशतः अनुदानित शिक्षकांचे पगार लवकरात लवकर सुरू व्हावेत असे साकडे घातले. ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे प्रमाण देत आपण सर्वांनी आपल्यातले वाईट दुर्गुण त्यागून सतगुणांचा व सत्कर्मांचा अवलंब करावा असे आवाहन करत सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.
सूर्यकांत मुंगसे व प्रदीप काळे यांनी गणपती स्थापनेचे महत्त्व स्पष्ट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच तालुकास्तरीय खोखो स्पर्धेत श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील 17 वर्ष वयोगटांमध्ये विद्यार्थ्यांनी द्वितीय तर 14 वर्ष वयोगटांमध्ये विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्या निमित्ताने खेळाडू विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच डॉ. आवारी यांनी विद्यालयातील आठवी ते दहावीच्या मुलींना वाढत्या वयामध्ये कोणती व कशी काळजी घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन केले.