Alandi News : बालविवाहप्रकरणी वधु-वर व साक्षिदारांवार गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वय लहान आहे माहिती असताना देखील वयाचा खोटा दाखला तयार करून लग्न करणाऱ्या वधु-वर व साक्षिदारांवार आळंदी पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा (Alandi News) दाखल करण्यात आला आहे. हे लग्न 13 जानेवारी रोजी आळंदी येथे झाले होते.

बालविवाह प्रतिबंध अधिकारी सोनाली धुमाळ यांनी आळंदी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.2) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून वधू, सौरव रणधीर मखरे, साक्षीदार अक्षय सुनिल साबळे (वय 25), सोमनाथ नाथा उघडे (वय25) व आकाश दादाराव नागदिवे (वय 24) सर्व राहणारे नवी मुंबई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari rime News : भागीदार व त्याच्या कर्मचाऱ्याकडून तीन कोटीची फसणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव व मुलीने आळंदी येथील सुत्र बंधन सामाजीक संस्था येथे रजिस्टर पद्धतीने लग्न केले. यासाठी दोघांना वयाचा खोटा दाखला दिला. त्यामुळे वधु वर व साक्षिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आळंदी पोलीस याचा पुढील तपास (Alandi News) करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.