Alandi News : घुंडरे आळी मधील विद्युत पोलला टेम्पोची धडक

एमपीसी न्यूज -आळंदी येथील घुंडरे आळी (Alandi News) मधील एका लोखंडी विद्युत पोलला टेम्पो धडकला.ही घटना काल (दि.17) रात्री 12 च्या सुमारास घडली. यात लोखंडी विद्युत पोल मोठ्या प्रमाणात वाकला आहे.याबाबतची माहिती विद्युत कर्मचारी अजय घुंडरे यांनी दिली.

 

 

 

या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.रात्री ही घटना घडल्या नंतर तत्काळ विद्युत कर्मचारी,पोलीस व अग्निशमन दलाचे कर्मचारी तेथे पोहचले होते.

 

Pune News : पोलीस भरतीची लेखी परीक्षा दोन एप्रिल रोजी

 

तसेच आळंदी( ता. हवेली) मधील देहू फाटा येथे एम एस सी बी चे पोल हे वाहतूकीस अडथळे निर्माण करत आहे.यावर प्रशासनाने तोडगा काढणे गरजेचे आहे.असे मत (आळंदी वाहतूक विभाग) पोलीस आधिकारी शहाजी पवार (Alandi News) यांनी व्यक्त केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.