Alandi News : जया एकादशी निमित्त माऊलीं मंदिरात आकर्षक फुलसजावट

एमपीसी न्यूज- आज (दि.1 फेब्रुवारी) जया एकादशी निमित्त श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर संजीवन समाधी मंदिरात श्रींच्या संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.यावेळी माऊलीं मंदिरात (Alandi News) आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली होती.इंद्रायणी नदी घाटावरती सुध्दा आज स्नानासाठी गर्दी होती.
एकादशीचे औचित्य साधून दि.1 फेब्रुवारी पासून मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 7 ते 12 ज्ञानेश्वरी पारायण,4 ते 5 प्रवचन ,6:30 ते 8:30 हरी कीर्तन अशी या कार्यक्रमांची रूपरेषा असणार आहे.
YCMH : उपकरणे, साहित्य खरेदीचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत लेखापरिक्षण करा; ‘सीएम’, ‘डीसीएम’कडे मागणी
दि.1 रोजी ह भ प संतोष महाराज पवार ,दि.2 रोजी ह भ प योगेश बप्पा महाराज इंगळे,दि.3 रोजी ह भ प प्रेममूर्ती दीपक महाराज जाधव ,दि.4 रोजी ह भ प सुरेंद्र महाराज गुराळकर, दि.5 रोजी ह भ प शंकर महाराज लोंढे,दि.6 रोजी ह भ प गुरुवर्य धर्मराज दादा पाटील महाराज,दि.7 रोजी ह भ प सोमनाथ महाराज बदाले यांची कीर्तन सेवा संपन्न होणार असून दि.8 रोजी सकाळी 10 ते 12 यावेळेत ह भ प भागवताचार्य पांडुरंग महाराज रेड्डी यांचे काल्याचे कीर्तन संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे व्यासपीठ चालक उज्वला क्षीरसागर असून (Alandi News) आयोजक ह भ प प्रेमाबाई शिंदे,ह भ प शैलाबाई झापिडे ,ह भ प छबूबाई महामुनी,परमेश्वर वाडा, भोसले गल्ली व तुकया प्रसाद महिला भजनी मंडळ तुळजापूर हे आहेत.
एकादशी निमित्त मंदिरातील सर्व सुव्यवस्था देवस्थान व्यवस्थापक माऊली वीर यांनी पाहिली.