Alandi News : स्वच्छतागृहाच्या अस्वच्छतेमुळे दुर्गंधीचा त्रास

एमपीसी न्यूज- आळंदी येथील पीसीएमटी बस स्टॉप जवळील , स्मशान भूमीच्या प्रवेशद्वारा लगत असणाऱ्या पालिकेच्या स्वच्छतागृहामधील  मोठ्या प्रमाणात असणाऱ्या(Alandi News)अस्वच्छतेमुळे या परिसरात दुर्गंधी पसरत आहे.

 

त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या अत्यंविधी साठी येणाऱ्या नागरिकांना  स्मशान भूमीच्या प्रवेशद्वाराच्या परिसरातच अस्वच्छ असणाऱ्या त्या स्वच्छतागृहाच्या दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागतो.येथे मोठ्या प्रमाणात असणाऱ्या अस्वच्छतेमुळे व दुर्गंधीमुळे लघुशंकेसाठी त्याचा वापर बऱ्याचश्या नागरिकांना करता येत नाही.तसेच येथे कोपऱ्यात दारूच्या बाटल्यासह इतर मोकळ्या बाटल्या  पडलेल्या दिसून येत आहेत.

Kasarwadi Crime News : दहा टक्के परताव्याचे आमिष दाखवून साडे बारा लाखांची फसवणूक

फक्त लघुशंकेसाठी असलेल्या या स्वच्छतागृहात काही विकृत माणसे शौच करून जात आहेत. त्यामुळे तिथे अस्वच्छतेत भर पडून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी (Alandi News) पसरत आहे. काही खिडक्यांच्या जाळ्या तुटलेल्या अवस्थेत असून पाठीमागे प्लास्टिक कचऱ्यासह इतर कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

 

पीसीएमटी बस स्टॉप ,स्मशानभूमी प्रवेश द्वारा जवळील या स्वच्छतागृहांची पालिका प्रशासनाने वेळोवेळी स्वच्छता करून तेथील परिसर दुर्गंधी मुक्त करून स्वच्छ ठेवावा,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आनंदराव मुंगसे यांनी  केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.