Alandi News: गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त 93 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 71 व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला दात्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कोरोनाचे संकट असतानाही 93 जणांनी रक्तदान केले.

शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक, भगवान गडाचे सचिव गोविंद घोळवे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

आळंदीचे उपनगराध्यक्ष सागर बोरंदीया, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका योगिता नागरगोजे, सिद्धू बिराजदार, पिंपरी-चिंचवड भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस दीपक नागरगोजे, भाजपाच्या कायदा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत, विलास सांगळे, अनिल भन्साळी, दत्तात्रय पाटील, अविनाश बोरंदीया, विनोद पगडे, डॉ. नारायण जायभाय, अविनाश ढाकणे, किसन पालवे, विनोद मुंढे, गणेश शेठ आदी उपस्थित होते.

यावेळी कोरोनाचे संकट असतानाही जवळपास 93 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना जॅकेट, ब्लुटूथ, पाण्याचा जार भेट देण्यात आले.

नितीन सांगळे, ॲड. एस. एस. आघाव, जयराम गीते, गजानन नागरे, बाळासाहेब पालवे, सुनील सानप, माऊली थोरवे, समर्थ केकान, काशीनाथ गीते, महादेव मिसाळ, कैलास घुगे, गजानन गुट्टे, विशाल सांगळे, संजय सांगळे, दीपक मुंडे , महेश मुंडे , सचिन बांगर यांनी संयोजनात पुढाकार घेतला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.