Alandi News : पगारवाढ बैठकीनंतर आळंदीतील सफाई कर्मचाऱ्यांची कामास सुरवात

एमपीसी न्यूज : शहरातील कचरा उचलण्यासाठी घेण्यात आलेल्या पालिकेच्या ठेक्केदारा मार्फत नेमण्यात आलेले सफाई कामगार व तेथील गाडीवर असणारे चालक यांनी पगारवाढ चर्चा व्हावी यासाठी घंटागाडया चालकांनी कामबंद आंदोलन पुकारले होते.(Alandi News) प्रशासनाबरोबर पगारवाढ बैठक झाल्यानंतर आळंदीतील सफाई कर्मचाऱ्यांची कामास सुरवात केली.

तेथील कर्मचाऱ्याने माहिती दिली की, गेल्या तीन महिन्यांपासून पगारवाढ व्हावी यासाठी ठेकेदारांकडे मागणी केली आहे.चालकांना 9000  हजार रू तर सफाई कामगार महिलानां 7000 रु. पगार असल्याची माहिती सफाई गाडी चालकांकडून समोर आली आहे. या महागाई च्या काळात तुटपुंजा पगारावर कसे कुटुंब चालेल अशी प्रतिक्रिया काहीं सफाई गाडी चालकांनी दिली.

Tree collapsed : नेहरू नगर येथील गुलाब पुष्प उद्यानाजवळ झाडपडीची घटना 

या संबंधित परिस्थितीची माहिती ठेक्केदाराच्या संबंधित कामाच्या एका व्यक्तीस ,या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने दिली.ठेक्केदाराकडून आलेली व्यक्ती व  सफाई कामगार ,गाडी चालक यांच्यात दि.19 रोजी सकाळी साडे सातच्या दरम्यान बैठक झाली.(Alandi news) त्या बैठकी नंतर कामगारांनी सकाळी पावणे आठ ला कामास सुरवात केली. ठेक्केदारा मार्फत आलेल्या व्यक्तीला तेथील कामगारांच्या पगाराविषयी प्रश्न विचारल्या नंतर ते म्हणाले ठेकेदारांना याबाबत विचारणा करा असे उत्तर दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.