Alandi crime News : अविवाहित असल्याचे भासवत दुसरे लग्न करणाऱ्या भामट्याविरोधात गुन्हा

आरोपीचे पहिले लग्न झालेलं आहे तसेच त्याला पत्नी देखील आहे.

एमपीसी न्यूज – पहिलं लग्न झालेलं असून पाहिली पत्नी असतानाही दुसरे लग्न करणाऱ्या एका भामट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना 28 जून 2020 रोजी आळंदी येथे घडली.

याप्रकरणी 19 वर्षीय पीडित महिलेने शुक्रवारी ( दि.11) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नितीन कौतिक आहेर (वय. 30, रा. राणादेवपाडा, देवळा, नाशिक ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे पहिले लग्न झालेलं आहे तसेच त्याला पत्नी देखील आहे. असे असतानाही त्याने अविवाहित असल्याचे भासवून फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर गोड बोलून मोहात पाडत तिच्या इच्छेविरुद्ध विवाह करून तिची फसवणूक केली.

आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.