Alandi News : पद्मावती रस्त्यावरील ड्रेनेज लाईन कित्येक दिवस तुंबलेल्या अवस्थेत, नागरिक हैराण

एमपीसी न्यूज-आळंदी मधील पद्मावती रस्त्यावरील, तुळजा भवानी अर्बन बँके जवळ कित्येक दिवसांपासून ड्रेनेज  लाईन तुंबलेल्या अवस्थेत असून त्या ड्रेनेज लाईन मधील गटारीचे पाणी मोठ्या प्रमाणात (Alandi News) रस्त्यावर येत आहे.

त्यामुळे तेथील रस्त्याचा परिसर गटारीच्या पाण्यामुळे अस्वच्छ झालाच आहे. परंतु त्या रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या नागरिकांना त्या अस्वच्छ दुर्गंधी युक्त गटारीच्या पाण्याच्या अस्वच्छतेतून चालण्यासाठी वाट शोधावी लागत आहे.कित्येक दिवस ड्रेनेज  लाईन तुंबलेल्या अवस्थेत असल्याने व त्या ड्रेनेज लाईनचे अस्वच्छ दुर्गंधी युक्त पाणी रस्त्यावर येत असल्याने त्यातूनच नागरिकांना ये जा करावी लागते.

त्यामुळे या परिसरातील नागरिक त्या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत.पालिका प्रशासनाचे या समस्येकडे कित्येक दिवस दुर्लक्ष असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.पालिका प्रशासनाने या समस्येची त्वरित दखल घेऊन तिथे योग्य ती उपाय योजना करावी.अशी येथील नागरिकांची मागणी (Alandi News) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.