Alandi News : आळंदीत हिंदूहृदयम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती दिनानिमित्त अभिवादन

एमपीसी न्यूज : हिंदूहृदयम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आळंदीतील (Alandi News) विविध सेवाभावी संस्था, संघटना, पक्ष संघटना यांच्या वतीने हिंदूहृदयम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करीत पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी वायरमन, ठेकेदार, दुकानदार, वायरींग क्षेत्रात काम करणारी कंपनी KEIचे पदाधिकारी, पोलीस मित्र वेलफेअर्स फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी अभिवादन सभा आयोजित केली. यासाठी जगदंबा इलेक्ट्रिकचे उद्योजक दिलीप कुलकर्णी यांनी संयोजन केले. यावेळी वायरमन बंधूना वायर संदर्भात नवीन माहिती देत मार्गदर्शन करण्यात आले.

Pimpri News : शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड सज्ज

या प्रसंगी प्रशांत श्रीवास्तव, अनिल देशमुख, नेचर फाउंडेशनचे (Alandi News) अध्यक्ष संघटन सरचिटणीस भागवत काटकर, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, कार्यध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र पोलीस मित्र वेलफेयर ऑफ फाउंडेश इंडिया किरण कोल्हे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष पोलीस मित्र रवी पाटील, संदीप चोपडे, शिवा संघटनाआळंदी शहर अध्यक्ष सदाशिव साखरे, संजय राऊत, तुषार कुलकर्णी, विष्णू गोरे, विजय सोनवणे, शंकर कदम, भरत कदम, भागवत सेजुळ, शिवाजी जावीर, सोमनाथ साखरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.