Alandi News : आळंदी मध्ये महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

आळंदी:-आळंदी देवाची येथे इंद्रायणी तीरावर महात्मा गांधी स्मारक येथे गांधी विचारांचे नागरिक व काँग्रेस कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त गांधीजींच्या स्मारकास गुलाबपुष्प, वाहून त्यांना विनम्र (Alandi News )अभिवादन केले.

Chinchwad News : अणू उर्जा हा अधिक कार्यक्षम, सुरक्षित ऊर्जा स्रोत – अमृतेश श्रीवास्तव

 

यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या पुष्पाताई कुऱ्हाडे ,नंदकुमार वडगांवकर,धीरज कुबेर ,अर्जुन मेदनकर,ज्ञानेश्वर घुंडरे इ.नागरिक उपस्थित होते.महात्मा गांधी जयंती , पुण्यतिथी दिवशी  व इतर वेळी सुद्धा कायमच स्मारका जवळील काही अंतरावरच कचऱ्याचे साम्राज्य असल्याने उपस्थितांनी नगरपालिका प्रसाशनाचा निषेध केला.याची माहिती विठ्ठल शिंदे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.