Alandi News:सिध्दबेटामधील बाभळींच्या वृक्षांची अवैधपणे तोड

एमपीसी न्यूज- आळंदी येथील सिध्दबेटामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पर्णकुटीच्या मागील बाजूस काही अंतरावरच ठिकठिकाणी बाभळी चे लहान मोठे वृक्ष दिसून येतात.त्या पैकी 3 बाभळी च्या झाडांची( Alandi News)अवैध पणे कत्तल  करण्यात आली आहे.

तसेच येथील मोठं मोठ्या बाभळींच्या वृक्षांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात तोडून विक्री अथवा इंधनाच्या वापरासाठी त्याचा उपयोग व्हावा यासाठी त्या झाडांच्या फांद्या तेथील वृक्षाच्या खाली व दगडी कथड्यांच्या लगत वाळत ठेवलेल्या दिसून येत आहे.तर काही वाळलेल्या फांद्यांचे लाकूड तोडून ते इंधन विक्री करिता  व घरगुती इंधन वापरासाठी नेले जात आहे.

Chinchwad News: चिंचवड विधानसभा निवडणूक लढविण्यास शिवसेना इच्छुक – सचिन भोसले

  सिध्दबेट प्रवेशद्वाराच्या परिसरातील प्रशस्त जागेत एकीकडे पालिकेच्या मार्गदर्शना खाली विविध संस्था वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाचे कार्य करताना दिसतात. तर तेथूनच काही मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या बाभळीच्या वृक्ष व वृक्षांच्या फांद्याची तोड सातत्याने करण्यात येत आहे. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष कसे ? याबाबत नागरिकांडून आश्चर्य व्यक्त होत आहे. व अवैध पणे  येथील वृक्षतोड  करणाऱ्यांची ( Alandi News)चौकशी व्हावी.अशी मागणी वृक्ष प्रेमी नागरिकांच्या वतीने होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.